fbpx

जिल्हा कारागृहातील तरुण कैद्याचा मृत्यू ; मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२१ । वेगवेगळ्या गुन्ह्यात जळगाव येथील कारागृहात दाखल असलेल्या पवन महाजन (वय-२८) या कैद्याचा रात्री २ वाजेच्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना घडली. 

दरम्यान, गेल्या ८ दिवसापासून तो आजारी असतानाही कारागृह प्रशासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. बुधवारी पहाटे त्याचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. कारागृह प्रशासनावर जोपर्यंत कारवाई करण्यात येणार नाही तोपर्यंत त्याचा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.

याबाबत असे की, खून आणि गंभीर दुखपतीच्या गुन्ह्याप्रकरणी पवन महाजन हा गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा कारागृहात होता. काही दिवसांपूर्वी त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, रात्री २ वाजेच्या दरम्यान त्याचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, पवन आजारी असतानाही कारागृह प्रशासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे त्याचा मृत्यू झाला. कारागृह प्रशासनावर जोपर्यंत कारवाई करण्यात येणार नाही तोपर्यंत त्याचा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज