fbpx

विजेच्या धक्क्याने माळपिंप्रीच्या तरूणाचा मृत्यू; दोन जण जखमी

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२१ । कपासाची गाडी भरत असतांना विजेचा धक्का लागल्याने २५ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जामनेर तालुक्यातील पाळधी येथे घडली. विशाल बाबुराव श्रीखंडे (वय-२५) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर यात दोन जण जखमी झाले असून त्यांना जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

याबाबत असे कि, जामनेर तालुक्यातील पाळधी येथे आज १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास व्यापाऱ्यानं ट्रक्मध्ये कापसाची गाडी भरत असतांना टपावर बसलेले तिघे जण ट्रकवरून खाली उतरत असतांनाविजेच्या तारांचा विजेचा जबर धक्का लागल्याने विशाल बाबुराव श्रीखंडे (वय-२५) रा. माळपिंप्री या मजूराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सोबत असलेले तर ज्ञानेश्वर श्रावण काळे व ज्ञानेश्वर सिताराम भजे रा. माळपिंपरी हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने जळगाव येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. या घटनेबाबत अद्याप पोलीसांत कुठेही नोंद करण्यात आलेली नाही.

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज