बेपत्ता इसमाचा मृतदेह तीन दिवसांनी विहिरीत आढळला

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२१ । शहरातील जोशीपेठेत राहणाऱ्या ४६ वर्षीय इसमाचा मृतदेह मेहरूण तलावाजवळ असलेल्या विहिरीत आढळून आला आहे. मयताचे नाव विजय हरी विधाते असे असून तो तीन दिवसांपासून बेपत्ता होता.

शहरातील जोशीपेठ परिसरात राहणारे विजय हरी विधाते वय-४६ हे दि.२६ रोजी सकाळी १० वाजेपासून कुणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेले होते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता. बुधवार दि.२९ रोजी दुपारच्या सुमारास मेहरूण तलावाच्या वरील भागात असलेल्या एका विहिरीत मृतदेह तरंगत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती.

एमआयडीसी पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. पोलीस मित्र समाधान नाईक व रवी हटकर यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. कपड्यांच्या वर्णनावरून पोलिसांनी तपास केला असता त्यांची ओळख पटली. विजय विधाते हे बेपत्ता झाल्यानंतर तीन दिवसांनी त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज