एलसीबीचा डंका : ५ गावठी कट्टे, ७ काडतूससह चौघांच्या मुसक्या आवळल्या

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२२ । जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पोलीस प्रशासन दणक्यात कामाला लागले असून गुरुवारी एलीबीच्या पथकाने ५ गावठी पिस्तूलसह चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच १ मॅगझीन आणि ७ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

जळगाव शहरात अवैध धंद्यांवर कारवाई केल्यानंतर बुधवारी गुटख्याच्या कारवाया करण्यात आल्या होत्या. एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव फाट्याजवळील उड्डाण पुलाजवळ गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची तसेच विदगाव येथील वैष्णवी हॉटेलजवळ एका तरुणाकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार बकाले यांनी तात्काळ पथक रवाना केले होते.

पथकातील सहाय्यक निरीक्षक जालिंदर फळे, सहाय्यक फौजदार अशोक महाजन, महेश महाजन, ईश्वर पाटील, विजय चौधरी यांचे पथक तपासकामी विदगाव येथे गेले होते. तर पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, सुनील दामोदर, लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, रणजित जाधव, श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, मुरलीधर बारी यांचे पथक वरणगाव येथे रवाना झाले होते. दोन्ही पथकांनी मिळालेल्या माहितीनुसार कारवाई केली. ऑर्डनन्स फॅक्टरी पुलाजवळ संजय गोपाल चंदेले रा.वरणगाव, गजानन शांताराम वानखेडे रा.तरोडा, ता.मुक्ताईनगर, निखिल महेश चौधरी रा. वरणगाव यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील १ लाख १४ हजार किमतीचे ४ गावठी पिस्तूल, मॅक्झीन, ४ जिवंत काडतूस जप्त केले.

दुसऱ्या पथकाने वैष्णवी हॉटेल विदगाव येथील सागर दिलीप कोळी याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील १ गावठी कट्टा आणि ३ जिवंत काडतूस असा ३३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एकाच दिवशी ५ गावठी कट्टे हस्तगत करण्यात आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -