fbpx

शेंदुर्णीत दंगल : दोघे जखमी, २० गाड्या, दुकानांचे नुकसान

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२१ । जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे दोन गटात वाद दगडफेक झालीय. यात दोन जण जखमी तर १५-२० गाड्यांचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता घडली. यात एसटीवरही दगडफेक झाली असून काही दुकानांचे नुकसान झाले आहे.

याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून चौकशी सुरू होती. गावात तणावपूर्ण शांतता असून राखीव दलाची तुकडी तैनात केली आहे. घटनेमागील निश्चित कारण समजू शकले नाही.

दरम्यान, घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी भेट देत आरोपींची गय केली जाणार नाही असे आश्वासन दिले.
कुमावत गल्लीतून पारस चौकाकडे जाताना बोलचालीमुळे दोन गटात दगडफेक झाली. हे वृत्त शहरात पसरताच दुकाने पटापट बंद झाली व नागरिकांची पळापळ झाली. पहूर दरवाजा, बसस्थानक, कुंभार गल्ली, देशपांडे गल्ली, कुमावत गल्ली, पारस चौक, मोमिन गल्ली, लोकमान्य टिळक चौक, गोंधळपुरा भागात वाहनांचे नुकसान करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी भरत काकडे, पोलिस निरीक्षक अरुण धनवडे व पथकाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज