fbpx

सततच्या पावसामुळे कपाशी व मका पिकांचे नुकसान

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२१ । एरंडोल तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत होणाऱ्या पावसामुळे कपाशी व मका या खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. या पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव दिसून येतो. निसणी च्या वेळी मका पिकाला पाणी न मिळाल्यामुळे उतारा कमी बसणार आहे तर कपाशीचे फुल पाते गळाले आहेत. कपाशीच्या कैद्यांवर काळे डाग पडले आहेत.

अति पावसामुळे कपाशी मूग सह खरीप पिके धोक्यात आली आहेत कपाशी हे नगदी पीक असल्यामुळे शेतकऱ्यांना कपाशी बाबाजी आशा होती ती आशा धुळीस मिळाले आहे एकंदरीत पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने दिलेली ओढ पावसाचा अनियमितपणा आणि आता सतत होणारा पाऊस या नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप पिकांवर पाणी फिरले आहे.

“अंजनी ” च्या जलसाठ्यांची शतकी वाटचाल
तालुक्याची लाईफ लाईन असलेल्या अंजनी धरण ७२.१९% भरले आहे. एकूण जलसाठा १५.०५ दलघमी इतका आहे. एखादा पाऊस पडला तरी अंजनी धरणात १००% पाणी साठा होऊ शकतो. खडकेसिम तलाव ८०% भरला आहे मात्र भालगाव तलाव जेमतेम४०% भरला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज