गारबर्डी धरण ‘ओव्हरफ्लो’; शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण

बातमी शेअर करा

 

जळगाव लाईव्ह न्यूज | ईस्हाक शेख पाल | सुकी नदीवरील रावेर तालुक्याच्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले गारबर्डी धरण १०० टक्के भरल्याने ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे. त्यामुळे सुकी नदीपात्रात पाणी वाहायला लागल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

या धरणात साधारणतः ५०.१६ दशलक्ष घनमीटर उपयुक्त साठा उपलब्ध आहे. गेल्या आठवड्यापासून मुसळधार पावसामुळे धरण भरले

 

असून या पुढील नदीकाठी असलेल्या गावांमधील शेतकऱ्यांनी नदी पात्रातून वापरताना काळजी घेणे गरजेचे आहे. पाण्याचा प्रवाह सुकी नदी पात्रात संथगतीने वाहत असून लोहारा, उटखेडा, चिनावल, निंभोरा, दसनूर अशी वाहत जाऊन बलवाडीजवळ सुकी नदी तापी नदीत विलीन होते. या नदीत पाणी वाहू लागल्यानंतर या परिसरातील विहिरींची पाण्याची पातळी वाढण्यासाठी त्याचा फायदा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह व आनंदाचे वातावरण आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -