नातीच्या लग्नाला आलेल्या आजीच्या पर्सवर डल्ला

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२१ । गांधी मार्केटमध्ये खरेदी करीत असताना एका वृद्धेच्या पर्समधील १५ हजारांची रोकड व दागिने, असा १ लाख १० हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना सोमवारी घडली. जिजाबाई वासुदेव कोळी ( वय ६० रा. अडावद, ता. चोपडा ) असे वृद्धेचे नाव आहे. याप्रकरणी वृद्धेच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर असे की, शहरात वास्तव्याला असलेल्या नातीचे लग्न असल्याने जिजाबाई या १२ नोव्हेंबरपासून मुलीकडे आल्या आहे. सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास नातीने दुचाकीवरून शहरात गांधी मार्केटजवळ सोडले. एका दुकानात साड्या घेण्यासाठी गेल्या असता तेथे अनिता सूर्यवंशी व सोनाली सूर्यवंशी या नातेवाइकांना भेटल्या. त्यांच्यासोबत जिजाबाई यांनी साड्या घेतल्या.

नंतर समोरूनच रथ जात असल्याने दर्शनासाठी रस्त्यावर आल्या. त्यानंतर केळी घेण्यासाठी विक्रेत्याकडे गेल्या. त्याला पैसे देण्यासाठी बॅगमध्ये हात घातला असता, पैसे असलेली लहान पर्स दिसली नाही. या पर्समध्ये ७५ हजारांचा २६ ग्रॅमचा सोन्याचा तुकडा, १५ हजार रुपयांचा ६ ग्रॅमचा सोन्याचा तुकडा व २० हजार रुपये रोख, असा १ लाख १० हजारांचा ऐवज होता. मंगळवारी सायंकाळी त्यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. तपास किशोर निकुंभ करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज