दुचाकीच्या धडकेत दहिवदचा युवक ठार ; अज्ञात चालकविरुद्ध गुन्हा

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२१ । आळनेर तालुक्यातील दहिवद येथील २२ वर्षीय युवकाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना १४ रोजी घडली. नितीन विठोबा माळी असे मृताचे नाव आहे.

१४ रोजी सायंकाळी मृत नितीन हा पायी जात होता. वामन माळी यांच्या शेताजवळ दुचाकी चालकाने (क्र. एम.एच.१८-बी.एस.३७९०) त्याला मागून धडक दिली. या अपघातात डोक्याला मार लागल्याने नितीनचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सुखदेव माळी यांनी अमळनेर पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात चालकविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल झाला.

या घटनेमुळे दहिवद गावावर शोककळा पसरली. त्यामुळे दरवर्षी पारंपरिक पद्धतीने निघणारी देवकाठी मिरवणूक यंदा रद्द करण्यात आली होती. तसेच ग्रामस्थांनी दसऱ्याचा सण साजरा केला नाही. घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज