fbpx

विष प्राशन करून दहिगावच्या शेतकऱ्याची आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२१ । यावल तालुक्यातील दहीगाव येथील एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी घडली. योगेश देविदास महाजन (वय-४४) असे या शेतकऱ्याचे नाव असून याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असं की, दहिगाव येथे योगेश महाजन हे आपल्या दोन मुलांसह वास्तव्यास आहे. तीन वर्षांपूर्वीच त्यांच्या पत्नीचं निधन झालं होत. आज सकाळी योगेश महाजन हे शेतात कामाला निघून गेले होते. शेतातच आज त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली.

हा प्रकार त्यांच्या शेतातील शेजारी शेतकरी निंबादास रेवा महाजन यांचा लक्षात आली. त्यांनी तातडीन भानुदास महाजन यांना फोनद्वारे कळविले. यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तिडके यांनी मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी भानुदास महाजन यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस हॅड कॉस्टेबल सिकंदर तडवी हे करीत आहे .

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज