fbpx

‘तौत्के चक्रीवादळाने’ घटला तापमानाचा पारा, जळगावकरांना दिलासा

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२१ । समुद्र किनारपट्टीवरून गेलेल्या चक्रीवादळामुळे राज्यातील वातावरण गेल्या आठवड्यापासून बदलले आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात ढगाळ वातावरण आणि वाऱ्यामुळे तापमान घटले आहे. मे महिन्यात ४३ अंशांकडे वाटचाल करणारा पारा प्रथमच ३७.२ अंश सेल्सिअस एवढ्या नीचांकी पातळीवर आला आहे.

जळगाव जिल्ह्यात दरवर्षी मे महिन्यात तापमान किमान ४५ ते ४८ अंशाच्या वर पोहोचते. असे असले तरी यंदा मे महिन्यात तापमानाचा पारा ४० ते ४२ पर्यंत होता. त्यात तोत्के चक्रीवादळामुळे वातावरणात चांगलाच बदल झाला. परिणामी ऐन उन्हाळ्यात ढगाळ वातावरण आणि वाऱ्यामुळे तापमान घटले आहे. मे महिन्यात पारा प्रथमच ३७.२ अंश सेल्सिअस एवढ्या नीचांकी पातळीवर आला आहे. तापमानात काहीशा घट झाल्याने जळगावकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

मध्य महाराष्ट्रासह राज्यात पावसाची शक्यता

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य महाराष्ट्रासह राज्यात काही भागात पूर्वमाेसमी पावसाचा मुक्काम २१ ते २४ मे असा आणखी चार दिवस लांबला आहे. दरम्यान, अंदमान बेटांवर मान्सूनच्या आगमनाची प्रक्रिया सुरू झाल्याची नोंद हवामान विभागाने घेतली. तोत्के चक्रीवादळाचा कोणताही परिणाम मान्सूनच्या प्रवासावर झालेला नाही असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

ढगाळ वातावरण आणि वाऱ्याचा वाढलेला वेग कायम राहणार

समुद्र किनारपट्टीवरून गेलेल्या चक्रीवादळामुळे राज्यातील वातावरण गेल्या आठवड्यापासून बदलले आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यात वातावरण ढगाळच आहे. काही भागात अधूनमधून पूर्वमोसमी पावसाचे आगमनदेखील आत आहे. हे चक्रीवादळ विरून गेल्यानंतरदेखील राज्यात पूर्वमोसमी पावसाचा आणखी चार दिवस मुक्काम राहणार आहे. विदर्भात दोन दिवस तर मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि मराठवाड्यात चार दिवस पूर्वमोसमी पाऊस होऊ शकतो. ढगाळ वातावरण आणि वाऱ्याचा वाढलेला वेगदेखील कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज