चाळीसगावला विचित्र अपघात, दोन ट्रकच्या धडकेत सायकलस्वार ठार, एक गंभीर

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ डिसेंबर २०२१ । दोन ट्रक समोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार व अन्य 1 जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज मंगळवारी रात्री सात वाजेच्या सुमारास चाळीसगाव-धुळे रेल्वे उड्डाण घडली आहे, या अपघातामुळे जवळपास तासभर वाहतूक विस्कळीत झाली होती.

अपघात झाल्यानंतर आजूबाजूला असलेल्या गवतात आणखि कुणी अडकले आहे का याचा शोध पोलीस घेत होती. अपघातातील आणखी काहीजण सापडण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपासाला सुरुवात केली आहे. पोलीस निरीक्षक के के पाटील स्वतः आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी तळ ठोकून होते,

याबाबत अधिक माहिती अशी धुळ्याकडून चाळीसगाव कडे येणारी ट्रक क्र.एम एच 18 -AA 5175 ने समोरून येणारी ट्रक क्र एच18 -BA -2191 धडक दिल्याने दोनही ट्रक पुलावर अधांतरी लटकल्या अपघातात सायकलस्वार सापडल्याने त्याचा पूर्णतः चेंदा झाला तर अन्य एक जण जखमी आहे जखमी मृताचीओळख पटवली जात आहे दोन्ही वाहनांचे चालक अजून मिळून आलेले नाहीत.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar