सीआरपीएफच्या जवानाचा अल्पशा आजाराने मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२१ । चाळीसगाव शहरातील पंचशील नगरातील रहिवाशी व सीआरपीएफमध्ये कार्यरत असलेले जवान चंद्रदीप रमेश आव्हाड (वय-३२) यांचे दि.२२ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

चंद्रदीप रमेश आव्हाड हे छत्तीसगड राज्यातील विसापूर येथे सेवेत नियुक्त होते. गेल्या काही दिवसांमध्ये सेवेवर कार्यरत असतानाच ते अचानक आजारी पडले. त्या आजाराचे रूपांतर हळूहळू कावीळ या आजारामध्ये झाले. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना घरी बोलावून घेतले. आणि नाशिक येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. अखेर बुधवार दि.२२ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे पंचशील नगरात हळहळ व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज