गोमांस विक्री करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२१ । यावल तालुक्यातील सावखेडा सीम येथे विनापरवाना गोमांस विक्री करणाऱ्या तरूणावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. तरुणाकडून गोमांस जप्त करण्यात आले आहे.

यावल तालुक्यातील सावखेडा सीम परिसरात बेकायदेशीरित्या गोमांस विक्री होत असल्याची गोपनिय माहिती यावल पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी कर्मचाऱ्यांना सुचना देवून कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, पोकॉ अनिल साळुंखे यांनी गुरूवारी ३० डिसेंबर रोजी कारवाई केली. पथकाने शेख कलीम शेख रशीद (वय-३२) रा.सावखेडा ता.यावल याच्याकडून गोमांस जप्त केले आहे. याप्रकरणी पो.कॉ.अनिल साळुंखे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -