चाळीसगाव येथे नायलॉन मांजा विकणाऱ्यावर गुन्हा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२२ । चाळीसगाव शहरात एका दुकानावर कारवाई करुन पाेलिसांनी जवळपास ८ हजारांचा नायलाॅन मांजा जप्त करुन गुन्हा नाेंदवला आहे. ही कारवाई ९ रोजी केली.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील रचना पुस्तकालय नावाच्या दुकानात ९ जानेवारी रोजी संतोष किसन येवले हा नॉयलॉन मांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली हाेती. यानंतर पाेलिसांनी केलेल्या कारवाईत या दुकानातून ८ हजार १०० रुपये किमतीचा ४५ बंडल नायलॉन मांजा जप्त केला आहे. या प्रकरणी दुकानदार संताेष येवले याच्याविरुद्ध कारवाई करून चाळीसगाव पाेलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

या पथकाने केली कारवाई

सहायक पाेलिस निरीक्षक सचिन कापडणीस, पाेलिस उपनिरीक्षक अमोल पवार, पाेलिस हेड काॅन्स्टेबल अभिमन पाटील, पाेलिस नाईक पंढरीनाथ पवार, सुभाष घोडेस्वार, रवींद्र पाटील, पाेलिस काॅन्स्टेबल प्रकाश पाटील, नीलेश पाटील यांनी केली.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -