fbpx

विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२१ ।  जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी आठ जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील एका भागात राहणारी (वय २२) विवाहित आपल्या कुटुंबीयांसह राहते. 17 सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शहरातील रामनगर येथील रहिवासी दया खामकर, बाजीराव खामकर, खंडू देसले, वंदना खामकर, सोनी बाजीराव खामकर, त्रिशा, वैशाली (पूर्ण नाव माहीत नाही) यांनी विवाहिता दांडिया खेळत असताना धक्का लागल्याने वरील आठ जणांनी शिवीगाळ करून मारहाण करत विनयभंग केला.

mi advt

याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल फारूक तडवी करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज