विवाहितेच्या आत्महत्या‎प्रकरणी पतीसह ५ जणांवर गुन्हा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ डिसेंबर २०२१ । मुळची कोलकाता आणि सध्या जळगावातील पतंग गल्ली, जोशीपेठमध्ये राहणाऱ्या मविवाह‎ केलेल्या तुंपा बसुदेव घोरई (वय‎ २०) या विवाहितेने ‎१७ डिसेंबर रोजी‎ ‎ पहाटे गळफास‎ ‎घेऊन‎ ‎आत्महत्या‎ केली. तुंपा हिने माहेराहून पाच लाख‎ रुपये हुंडा आणावा यासाठी पतीसह‎ सासरच्या लोकांनी छळ केल्याने‎ तिने आत्महत्या केल्याचा गुन्हा‎ शनिपेठ पोलिस ठाण्यात दाखल‎ करण्यात आला आहे.‎ मूळची पश्चिम बंगाल येथील‎ रहिवासी असलेली तुंपा हिने बसुदेव‎ घोरई याच्याशी प्रेमविवाह केला‎ होता. काही दिवसांपूर्वीच‎ कुटुंबीयांच्या रितीरिवाजाने त्यांनी‎ ‎ लग्न केले होते. तुंपा ही पतीसह‎ जाेशीपेठेत राहत होती. १६ डिसेंबर‎ रोजी रात्री पतीसह सासरच्या‎ लोकांनी तिला मारहाण केली. हुंडा‎ मिळाला नाही म्हणून आता‎ माहेराहून पाच लाख रुपये आणावे‎ अशी मागणी करत शारीरिक व‎ मानसिक छळ केला. या त्रासाला‎ कंटाळून तिने गळफास घेऊन‎ आत्महत्या केली, तिच्या‎ आत्महत्येस पतीसह सासरचे लोक‎ जबाबदार आहेत. अशी फिर्याद‎ तुंपाचे वडील अलोकेश वैजनाथ‎ पंजा (वय ५२, रा. पश्चिम बंगाल)‎ यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात दिली.‎ त्यानुसार तुंपाचा पती बसुदेव सनत‎ घोरई, सासरा सनत घोरई, सासू‎ अर्चना घोरई, नणंद व नंदोई अशा‎ पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल‎ करण्यात आला आहे. पोलिस‎ उपनिरीक्षक यशोदा कणसे तपास‎ करीत अाहेत.‎

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -