fbpx

Credit Card वापरकर्त्यांनो खरेदी करतांना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२१ । देशभरात सण उत्सवांचे पर्व सुरु झाले आहे. सण उत्सवांच्या काळात खरेदी करणे शुभ मानले जात असल्याने या दरम्यान, मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. विविध कंपन्यांकडूनही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारचे डिस्काउंट दिले जातात आणि या डिस्काऊंटच्या नादत अनेक वेळा आपण आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च करत असतो, परंतु काही वेळा ही खरेदी तुम्हाला महागात पडू शकते. हा त्रास तुम्हाला टाळायचा असेल तर क्रेडिट कार्डचा वापर करतांना तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत.

क्रेडिट कार्डने खरेदी करतांना नेहमी लक्षात ही गोष्ट लक्षात ठेवा की, तुम्हाला परवडेल तितकेच खरेदी करा. अशी परिस्थिती उद्भवू देऊ नका की ज्यामुळे तुम्हाला किमान शिल्लक पेमेंटसह काम करावे लागेल आणि त्याऐवजी व्याज म्हणून मोठी रक्कम द्यावी लागेल. किमान देय रक्कम थकबाकीच्या ५ टक्के आहे. मात्र, यात ईएमआय समाविष्ट नाही. किमान रक्कम भरल्यास कोणताही दंड आकारला जात नाही, तरी व्याज भरावे लागते.

mi advt

अनावश्यक वस्तूंची खरेदी टाळा
कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यामुळे बाजारात खरेदीदारांची गर्दी वाढली आहे. खरेदी करीत असतांना अनावश्यक वस्तू खरेदी करणे टाळा. लक्षात ठेवा की तुम्हाला एखादी वस्तू तातडीने हवी नसल्यास त्याची खरेदी पुढे ढकलावी.

गरज असेल तरच क्रेडिट कार्डातून पैसे काढा
आपल्याला क्रेडिट कार्डद्वारे रोख रक्कम काढण्याची सुविधा देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी व्याज द्यावे लागते. त्यामुळे गरज असेल तरच क्रेडिट कार्डमधून पैसे काढा. रोख रक्कम काढण्यासाठी अनेक प्रकारचे शुल्क आहेत आणि व्याज दर देखील खूप जास्त आहे.

रिवॉर्डस पॉईंटस करा वापर
जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डने खर्च करता, तेव्हा तुम्हाला मोबदल्यात रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात. मात्र, त्याची एक्स्पायरीही असते. अशा परिस्थितीत, क्रेडिट कार्डमधून मिळणाऱ्या रिवॉर्ड पॉइंटवर लक्ष ठेवा आणि वेळोवेळी त्याचा वापर करत रहा.

सिबिल स्कोअर नादात वाहून जाऊ नका
क्रेडिट वापर गुणोत्तराकडे देखील लक्ष द्या. ‘पैसा बाजार’चे साहिल अरोरा सांगतात की, CIBIL स्कोअर सुधारण्यासाठी कधीकधी कार्डधारक जास्त खर्च करतात. जर क्रेडिट वापर गुणोत्तर ३० टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर क्रेडिट ब्युरो त्यावर विशेष लक्ष ठेवतात आणि CIBIL स्कोअर देखील कमी करू शकतात.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज