मोर धरणात बुडून गुराख्याचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२१ । यावल तालुक्यातील हिंगोणा शिवारातील असलेले मोर धरणाच्या काठावर गुरे चारणाऱ्या गुराख्याचा पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. रहिवाशी गुलशेर सुमाऱ्या बारेला (वय-५२) असे मृताचे नाव असून याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

याबाबत असे कि, मोर धरण येथील रहिवाशी गुलशेर बारेला हे २२ ऑक्टोबर रोजी ते हिंगोणा शिवारातील मोर धरणाजवळ गुरे चारत असतांना त्यांचा पाय घसरल्याने ते पाण्यात पडले. त्यावेळी सोबत कुणीही नव्हते. दरम्यान दुसऱ्या दिवशी २३ ऑक्टोबर रोजी त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आला आहे.

मृतेदह कुजलेला असल्यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज तडवी यांनी जागेवरच मृतदेहाचे शवविच्छेदन केले. हिंगोणा येथील पोलीस पाटील दिनेश बाविस्कर यांनी फैजपूर पोलीस ठाण्याला ही माहिती दिली. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरेश्वर आखेगावकर, पोहेकॉ सुरदास चाटे यांनी भेट दिली. पोलीस पाटील दिनेश बाविस्कर यांच्या खबरीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज