fbpx

तोंडापूर येथील १०० गावकऱ्यांनी घेतली कोविशिल्ड लस

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२१ । जामनेर तालुक्यातील फत्तेपूर आरोग्य केंद्र अंर्तगत तालुका वैद्यकीय अधिकारी राजेश सोनवणे याच्या आदेशानुसार तोंडापूर येथील उपकेंद्रात कोरोना लसीकरण शिबीर आयोजन करण्यात आले होते. लसीकरणासाठी आरोग्य सेवक कुणाल बावस्कर व आरोग्य सेविका उषा सानप भागवत वानखेडे, के. पि. शहाणे या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकाने विशेष परिश्रम घेत ४५ वर्ष वयाच्या पुढील व ज्यानी अगोदर पहिली लस घेण्यात आली त्याना प्राधान्यता क्रम देवून पहिली व दुसरी लस दिली.

गावात गेल्या महिन्यात कोरोना रुग्ण संख्या वाडल्याने व मुत्यु च्या प्रमाण वाढल्यामुळे गावकऱ्यांनी उस्फुर्त आरोग्य उपकेंद्रात जावून लसीकरण करून घेतले त्यावेळी माजी सरपंच नाना पाटील लक्ष्मण जोशी, सतीश बिऱ्हाडे यानी लसीकरण करून घेतले.गावातील आशा स्वयसेविका रजनी जैन ,देवकाबाई  मोरे, सुमित्रा साबळे, रुख्मिणी सोन्ने, सुरेखा खिल्लारे, नितीन बानु ,यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज