जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२१ । शहरात रस्त्यावर रात्री विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची रस्त्यावरच अँटीजन टेस्ट करण्यात येत असून बुधवारी रात्री २ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
बुधवारी रात्री कोर्ट चौकात पोलिसांकडून १०१ नागरिकांची अँटीजन तपासणी करण्यात आली. यावेळी पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, अनिल बडगुजर, प्रताप शिकारे, धनंजय येरुळे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मनपा प्रशासनाकडून नागरिकांची अँटीजन टेस्ट डॉ.संजय पाटील, राहुल निंबाळकर, निखिलेश भिडे, संकेत पाटील, हिमांशू भावसार, योगेश जोशी यांच्या पथकाने केली. पॉझिटिव्ह मिळून आलेल्या दोन्ही रुग्णांना लागलीच रुग्णवाहिकेद्वारे कोविड केअर सेंटरला पाठविण्यात आले.
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/128759582507696/