fbpx

जळगाव आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर ; रस्त्यावर आढळल्या कोव्हॅक्सीनच्या लसी

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ जुलै २०२१ । राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुडवता असतांना जळगाव जिल्ह्यात नेल्या जात असलेल्या लसी कळवण तालुक्यात मात्र सायंकाळी रस्त्यावर बेवारस आढल्या आहेत. लस वाहतूकदार तसेच जळगाव आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला आहे.

कळवण तालुक्यातील आठंबे ते नांदुरी या रस्त्यावर कोव्हॅक्सीन ही लस ४ ते ५ किलोमीटर अंतर दरम्यान बेवारस पडलेल्या आढळल्या. नाशिक येथील रहिवासी असलेले कल्पेश विजय जेठार हे नाशिक कडे जात असतांना त्यांना रस्त्यावर काही औषधाचे बॉक्स पडलेले आढळले. त्यांनी ते उचलून बघितले असता त्यात कोव्हॅक्सीन ही लस असल्याचे आढळले.

mi advt

त्यात एकूण १४ बाटल्या होत्या तर काही लसीचा बाटल्या फुटून गेल्या होत्या.त्यांनी रस्त्यावर सापडलेले १४ बाटल्या घेऊन गोबापूर येथील आशा सेविका राधा खिल्लारी यांचाकडे ते सुपूर्द केल्या .तर त्या आशा सेविकेने नांदुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेले आरोग्य सेवक भीष्म पाटील यांचा ताब्यात या लस दिल्या तर आरोग्य सेवक पाटील यांनी वैधकीय अधिकारी डॉ  निर्मल सिद्धू  यांचा ताब्यात दिल्या.डॉ सिद्धू यांनी जिल्हा वैधकीय अधिकाऱ्यांना बेवारस लसीबाबत ची माहिती कळवली.दरम्यान बेवारस लसीची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी जिल्हा अधिकारी सुरज मांढरे,जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य उपसंचालकांना दिली.आरोग्य उपसंचालकांनी आज जिल्ह्यातील पथक पाठवून सापडलेल्या लस तसेच घटनास्थळाची पाहणी करून चौकशी केली.

यामध्ये या कोव्हॅक्सीन लस असून याचा एक बॉक्स आढळून आला आहे.त्याचा बॅच नंबर तपासला असता ही लस शासनाने जळगाव जिल्ह्यासाठी वितरित केल्याचे समोर आले आहे.लस वाहून नेणाऱ्या वाहन चालकांने जवळचा रस्ता म्हणून या मार्गाने वाहन नेले.तर लस आढळल्या त्या ठिकाणी दोन गतिरोधक असल्याने गाडी आदळल्याने लसीचा एक बॉक्स खाली पडल्याची शक्यता पथकाने व्यक्त केली आहे .आरोग्य उपसंचालकांनी याबाबत जळगाव आरोग्य विभागास खडसावले असून संबंधित चालक तसेच वाहतुकदारावर कारवाईचे निर्देश दिले असल्याची माहिती माहिती सूत्रांनी दिली 

ही लस जळगाव जिल्ह्याकरिता नाशिक येथून एका वाहनात घेऊन जात होते.हे वाहन स्पिड ब्रेकरवर गोबापूर येथे आढळल्याने गाडीत आईस पॅकसह १४ लसीचा बॉक्स वाहनातून पडला.बॉक्स मधून दोन लस रस्त्यावर पडल्याने त्यावरून वाहन गेल्यामुळे दोन लसचे नुकसान झाले.गोबापूर ग्रामस्थांने आशा वर्करकडे संपर्क साधल्यानंतर संबंधित आशा ने नांदुरी आरोग्य केंद्राला कळविले.तेथून नाशिक येथून संपर्क साधल्यानंतर नाशिक येथून सदर चालकांशी संपर्क साधून ईतर लस पडणार नाही याबाबत त्यास सूचना केली लसीचे फार नुकसान झाले नाही 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज