न्यायालयाचा निर्णय : मुलाची साक्ष अन् बापाला ६ महिने कारावास

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२२ । डांभुर्णी येथील आरोपी प्रकाश भीमसिंग बारेला यास यावल न्यायालयाने सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सदर आरोपी ने भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालवून एकाला मृत्युमुखी पडले होते. या बाबत आरोपीला शिक्षा सुनावण्यात अली असून या खटल्यात सरकारतर्फे अ‍ॅड.नितीन खरे यांनी तर आरोपी प्रकाश बारेलातर्फे अ‍ॅड.गौरव पाटील यांनी काम पाहिले.

तालुक्यातील साकळी शिवारात डांभुर्णी ते साकळी रस्त्यावर १७ एप्रिल २०१७ रोजी प्रकाश बारेला याने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर भरधाव वेगाने व हयगयीने चालवले. त्यामुळे ते पाटचारीत पलटले होते. यामुळे झालेल्या अपघातात सुकलाल लालसिंग बारेला हे दवल्या गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी यावल न्यायालयात न्या.एम एस बनचरे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली.

सरकारी वकील नितीन खरे यांनी सरकारतर्फे एकूण आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या. या खटल्यात विशेष म्हणजे सरकारी वकील खरे यांनी आरोपी प्रकाश बारेला याचा लहान मुलगा आकाश याची महत्त्वपूर्ण साक्ष नोंदवली. आकाशने सत्य परिस्थिती न्यायालयास सांगितली. अपघात झाला त्यावेळी त्याचे वडील हेच ते ट्रॅक्टर चालवत होते, हे कथन केले. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील यांनी केला. न्या.बनचरे यांनी आरोपी प्रकाश बारेला यास या प्रकरणी दोषी धरून सहा महिने साधा कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच पाच हजार रुपये नुकसान भरपाई मृत सुकलालचे वडील लालसिंग बारेला यांना देण्याचा आदेश दिला.

हे देखील वाचा:

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -