कुरियर कंपनीचा कंटनेर उलटला, दुचाकीस्वार जखमी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२१ । धुळेकडून जळगावच्या दिशेने येत असलेला भरधाव कंटेनर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ समोर नियंत्रण सुटल्याने उलटला. दरम्यान या अपघातामुळे बाजूने जात असलेला दुचाकीस्वार दुचाकी घसरून जखमी झाला आहे.

डिलिव्हरी कुरिअर कंपनीचा कंटेनर क्रमांक एमएच.११.सीएच.६०५५ हा कुरियरचे पार्सल घेऊन धुळेहून जळगावला येत होता. सकाळी ८ वाजेच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटनेर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ समोर उलटला. दरम्यान, अपघातामुळे बाजूने जात असलेल्या दुचाकी क्रमांक एमएच.१९.बीएच.७५३१ वरील चालक दुचाकी घसरून जखमी झाला आहे.

अपघातामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. महामार्ग पोलीस आणि पाळधी पोलिसांनी मार्ग मोकळा केला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -