fbpx

”सुबह के भुले शामको शादी कर लौटे”

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२१ । सकाळी घरातून निघालेले प्रेमीयुगुल सायंकाळी जामनेर पोलीस ठाण्यात लग्नगाठ बांधूनच परतल्याचा प्रकार सोमवारी घडला. सुबह के भुले शामको शादी कर लौटे असे म्हण ण्याची वेळ आल्याची चर्चा पोलीस ठाण्यात होत होती.

जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील तरुण व तरुणी पहाटे घरच्यांना चकवा देत बाहेर पडले. याची घरात माहिती पडताच संशय वाढला. नातेवाईकांनी शोध सुरु केला. अशातच दुपारी ते दोघे लग्न करुनच पोलिसांसमोर हजर झाले. 

पोलिसांनी दोघांच्या पालकांना बोलावून या शुभमंगल सावधानची माहिती दिली. पण मुलीने आई-वडिलांकडे जाण्यास नकार दिला. मुलीच्या पालकांनी तिला समजाविण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. त्यामुळे पालकही हतबल झाले. प्रेमीयुगुल सज्ञान असल्याने पोलिसांचाही नाईलाज झाला. मुलीच्या आई-वडिलांना शेवटी हिरमुसले होऊन परतावे लागले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज