महानगपालिकेने केली तब्बल 25 कोटीची वसूली

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२१ । शहर महानगपालिकेने मोठी कर वसुली केली आहे. महानगर पालिकेने यावर्षी 24 कोटी 99 लाख 72 हजार सहाशे चौतीस इतक्या रुपयांची वसूली केली आहे. मात्र, अजून असे काही नागरिक आहेत. ज्यांनी अजून  कर भरलेला नाही. अश्या नागरिकांनी लवकरात लवकर कर भरावा अन्यथा दंड भरावा लागेल. असे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे.

जळगाव महानगर पालिकेने 1 एप्रिल 2021 ते 8 नोव्हेंबर 2019 या कालावधीत तब्बल इतक्या लखाबाईची कर वसुली केली. प्रभाग क्रमांक 1 मधून 87125192 इतका कर वसुली करण्यात आला. तर प्रभाग क्रमांक दोन मधून 37241190 इतका कर वसूल करण्यात आला प्रभाग क्रमांक 3 मधून 62814049 इतका तर प्रभाग क्रमांक 4 मधून 62792203 इतका कर वसूल करण्यात आला.

म्हणून प्रभाग क्रमांक 2 मधून करवसूली झाली कमी

जळगाव शहर महानगरपालिकेत एकूण 4 प्रभाग आहेत. ज्यांची आकून 1,2,3,4 अशी रचना करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 1 मधून 87125192 इतका कर वसुली करण्यात आला. तर प्रभाग क्रमांक दोन मधून 37241190 इतका कर वसूल करण्यात आला प्रभाग क्रमांक 3 मधून 62814049 इतका तर प्रभाग क्रमांक 4 मधून 62792203 इतका कर वसूल करण्यात आहे. इतर प्रभागांच्या तुलनेत प्रभाग क्रमांक 2 मधून कमी कर वसूली झाली आहे. कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी व अनाधिकृत इमारती आहेत.

ऑनलाइनला पसंती मात्र, रोखची

वर्षोनुवर्षे महानगरपालिकेमध्ये नागरिकांना रांगा लावतात कर भरावा लागत होता मात्र यंदा सुरू केलेल्या महानगरपालिकेच्या ऑनलाइन कर भरणा उपक्रमाला जळगाव शहरातील नागरिकांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. जळगाव शहरातील नागरिकांनी तब्बल 86468909 रुपये इतका कर भरणा केला. असे जरी असले तरी या सगळ्यात बाजी मारली ती रोख रक्कमेने कर भरलेल्यांनी त्यांनी 95086657 इतकी रक्कम रोख स्वरुपात भरली आहे. तर जळगाओ शरातील नागरिकांनी चेक ने एकूण 68417068 रुपयांची रक्कम अदा केली.

नागरिकांनी लवकरात लवकर कर भरावा – उपायुक्त प्रशांत पाटील

जळगाव शरातील नागरिकांनी यंदा कर भरायला चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र असजून असे काही नागरिक आहेत ज्यांनी अजून कर भरलेला नाही. अश्या नागरिकांनी लवकरात लवकर नागरिकांनी कर भरावा अन्यथा नागरिकांना दंड भरावा लागेल.अशी प्रतिक्रिया महसूल विभागाचे उपायुक्त प्रशांत पाटील यांनी सांगितले  दिली.

 

मालमत्ता कराची वसूली कमी झाल्याने या विभागाच्या सहायक आयुक्त डॉ. संगीता हसनाळे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून ही चिंता व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. एका बाजूला आर्थिक मंदीचे सावट असताना दुसर्या बाजुला मालमत्ता कराची वसूली कमी होत असल्याने 31 मार्च 2020 पर्यंत अपेक्षित महसूल कमी झाल्यास महापालिकेच्या अर्थसंकल्पाचे गणित बिघडले जाण्याची भीती अधिकार्यांकडून व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज