मनपा कर्मचारी खुश : दोन वर्षांचा महागाई फरक अदा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ डिसेंबर २०२१ । महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सन २०१८ च्या महागाई फरकाची रक्कम अदा करण्यात आली आहे. त्यामुळे महानगरपालिका कर्मचारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महानगरपालिका कर्मचार्‍यांचा सन २०१८ व २०१९ मधील महागाई फरकाची रक्कम नगरपालिकेकडून अदा करण्यात आलेली नव्हती, महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याकारणाने त्या त्या वेळी कर्मचाऱ्यांना महागाई फरक अदा करण्यात आल्या नव्हता, त्यानंतर दिनांक ३० ऑक्टोंबर २०२१ रोजी मनपाचे मुख्य लेखाधिकारी कपिल पवार यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मनपा कर्मचाऱ्यांना सन २०१९ मधील महागाई फरकाची रक्कम अदा केली होती. या गोष्टीला एक महिना पूर्ण झाल्या नंतर पुन्हा महानगरपालिकेने कर्मचाऱ्यांची २०१८ मधील महागाई फरकाची रक्कम अदा केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दि. ३० ऑक्टोंबर रोजी महानगरपालिकेने कर्मचाऱ्यांना १ कोटी रुपयांचा महागाई फरक अदा केला होता. त्यानंतर दि. ३ डिसेंबर रोजी पुन्हा महानगरपालिकेने कर्मचाऱ्यांना १ कोटी २९ लाख रुपयांचा फरक अदा केला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar