कोरोनाचा हाहाकार! केंद्राने पुन्हा पत्र लिहून दिल्या राज्यांना ‘या’ सूचना, वाचा काय आहेत?

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२१ । देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना पुन्हा पत्र लिहिले आहे. केंद्राने राज्यांना सतर्क केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. ज्यात राज्यांनी आपल्याकडे ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा, अशी सूचना दिल्या आहे. पुरेसा मेडिकल ऑक्सिजन (medical oxygen) उपलब्ध राहील, याची काळजी राज्यांनी घ्यावी. यासाठी तात्काळ उपाययोना कराव्यात, अशी सूचना त्यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना केली आहे.

केंद्राने राज्यांना काय दिले निर्देश? वाचा…

रुग्णांची काळजी घेणाऱ्या सर्व आरोग्य सुविधा सज्ज ठेवा आणि किमान ४८ तास वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरेसा बफर स्टॉक उपलब्ध ठेवा
सर्व आरोग्य सुविधांमध्ये लिक्वीड वैद्यकीय ऑक्सिजन टाक्या पुरेशा प्रमाणात भरलेल्या हव्यात. रिफिलिंग टँकर्सचा अखंड पुरवठा असावा.
सर्व PSA प्लांट पूर्ण कार्यक्षमतेने चालण्याच्या स्थितीत असावेत, प्लांटच्या देखभालीसाठी सर्व आवश्यक पावले उचलली जावीत
सर्व आरोग्य केंद्रांवर पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन सिलिंडर असावेत. ऑक्सिजन सिलेंडरमध्ये बॅकअप स्टॉक आणि मजबूत रिफिल सिस्टम असणे आवश्यक आहे.
उच्च दर्जाच्या रुग्णालयांमध्ये लाइफ सपोर्ट उपकरणे उपलब्ध असावीत
ऑक्सिजन नियंत्रण कक्ष पुन्हा सुरू करावेत

दरम्यान, देशात आज पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येने (Corona Cases) मोठी उसळी घेतल्याचे दिसून आले. मागील 24 तासात देशात नव्याने आढळून आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1,94,720 एवढी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोना संसर्गाचा दर 11.05 टक्के एवढा झाला असून कालच्या तुलनेत रुग्णवाढीचा दर 15.9 टक्के एवढा जास्त नोंदवला गेला. तसेच देशातील ओमिक्रॉनच्या (Omicron) एकूण रुग्णांची संख्या 4868 एवढी झाली आहे. कोरोनाच्या या नव्या विषाणूचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही जास्त चिंताजनक बाब आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -