fbpx

कोरोनाचे लवकर निदान व त्वरित उपचार ही कोरोनावर मात करण्याची गुरुकिल्ली ; डॉ. संजय बनसोडे

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ मे २०२१ । कोरोना महामारीमुळे सर्वत्र भयाचे वातावरण आहे. गरोदरपणातील कोरोनाच्या लसीची ची उपयुक्तता, सुरक्षितता  व  दुष्परिणाम हा सध्यातरी संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे यंत्रणेने गरोदरपणात लसीकरणाची शिफारस केलेली नाही.कोरोनाकाळात महिलांनी औषधांवर अवलंबून न राहता  औषध उपचार सोबतच नैसर्गिकरित्या प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर द्यावा. त्यामुळे सुरक्षित गर्भधारणा राहण्यास मदत होते अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र व विभागाचे प्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी दिली आहे.

गर्भवती महिलांची रोगप्रतिकारकशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे त्यांना जंतू प्रादुर्भावापासून सुरक्षेसाठी जास्त   काळजी घ्यावी लागते. गर्भवतींना कोरोना संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. म्हणून त्यांनी घराबाहेर पडणे टाळलेच पाहिजे. बाहेर जावे लागले तर दरवाजाचे हॅन्डल, जिने, कट्टे, कठडे व इतर वस्तूंना स्पर्श करणे टाळावे.तसेच आपल्या नाका तोंडाचा स्पर्श टाळावा. मास्क कायम व योग्य पद्धतीने घातलेला  असायला हवा. सॅनिटायझर व साबणाचा वापर करीत हात वारंवार स्वच्छ केले पाहिजे.

mi advt

गर्भवती महिलांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढावी याकरिता भरपूर फळे खाल्ली पाहिजे. संत्री, मोसंबी, अननस,लिंबू पाणी(शक्यतो कोमट  पाणी) हि सी जीवनसत्वाची तर आता उन्हाळ्यामुळे टरबूज, डांगर अशी फळे शरीरातील पाणी वाढविण्यासाठी खाल्ली पाहिजे.आहारात प्रथिनांचा प्रमाण वाढवण्यासाठी दूध ,अंडी, केळी , मोड आलेले कडधान्य, गूळ शेंगदाण्याची चिक्की किंवा लाडू ई. समावेश करावा.बदाम ,खारीक,मनुके समावेश केले तर उत्तमच. मानसिक तणाव कमी करावा.कमीत कमी दिवसा २ तास व रात्री ८ तास झोप घेणे आवश्यक आहे.

रक्तात  हिमोग्लोबीन चे प्रमाण कमी असल्यास रोग प्रतिकार शक्ती कमी होते.त्यामुळे लोह च्या  गोळ्या योग्य प्रमाणात घ्याव्या. कॅल्शियम, मल्टिव्हिटॅमिन, antioxidant गोळ्या घेणे क्रमप्राप्त आहे. श्वसन मार्गातील संसर्गापासून रक्षण यामुळे होते. गर्भवती महिलेला कोरोना संसर्ग झाल्यास कोरोनाची औषधे उदा. फॅबी फ्लू, रेमेडिसवीर, आयव रर्मेक्टीन ,टॉसिलीझूमब, डॉक्सीसायक्लिन,उच्च स्टेरॉइड डोस देता येत नाही. त्यासाठी नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी वरील बाबीवर भर दिला पाहिजे.

पोट दुखणे, बाळाच्या हालचाली मंदावणे, अंगावरून रक्त किंवा पाणी जाणे, तीव्र डोकेदुखी जाणवणे अशी लक्षणे जाणवत असतील तर कोरोनाच्या भीतीमुळे घरी बसू नका. त्वरित डॉक्टरांना भेटून सल्ला घ्या.

गर्भाला काही धोका अथवा व्यंग होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते.ही काळजी पहिल्या तीन महिन्यांमध्ये अधिक घ्यायला हवी. गर्भवतींची पचनक्रिया, चयापचय क्रिया बदललेली असते. त्यामुळे औषधांचे परिणाम इतरांपेक्षा वेगळे असतात. सातव्या महिन्यांनंतर गर्भवती महिलेच्या फुफ्फुसांवर दाब असतो, कार्यक्षमता कमी असते. त्यामुळे संसर्ग झाल्यास व्हेंटिलेटर लावणे गुंतागुंतीचे ठरते. प्रसुती पूर्व अथवा सीझरियन पूर्व कोरोना तपासणी करून घ्यावी जेणेकरून त्यानुसार आई व नवजात शिशु वर उपचार करता येतील. कोरोनाबाधित गर्भवती महिलेला प्रसूतीनंतर बाळाला घेता येत नाही, मात्र योग्य काळजी घेऊन स्तनपान सुरु करता येते.

कोरोनाबाधित  स्तनदा मातांना लसीकरण उपयुक्त जरी असले तरी यंत्रणेने सध्याला तरी ते टाळण्याचे सांगितले आहे. बाधा झालेले सर्वच रुग्ण अत्यवस्थ होत नाही .अत्यवस्थ होण्याचे प्रमाण कमी आहे . बहुतांशी रुग्ण हे पूर्णपणे बरे होतात ही दिलासादायी बाब आहे, असेही डॉ.बनसोडे यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज