fbpx
Jalgaon Live News | Latest Jalgaon News | Jalgaon News in Marathi

राष्ट्रवादीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त कोरोना योद्धांचा प्रमाणपत्र, गुलाबपुष्प देऊन सन्मान

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२१ । पाचोरा येथील हुतात्मा स्मारक येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्ताने कोरोना योद्धांचा  सन्मान करण्यात आला.

यात पाचोरा शहर ग्रामीण रुग्णालय व तालुक्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवक आणि सेवकांचा प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांनी बोलताना सांगितले की, कोरोना योद्धे आहे म्हणून आज परिस्तिथी आटोक्यात आली आहे. कोरोना  योद्धांनी जीवापाड मेहनत केली आहे. प्रत्येक जीव वाचवण्यासाठी जीवापार प्रयत्न केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे 20 टक्के राजकारण आणि 80 समजसेवा आहे.

यांची होती कार्यक्रमाला उपस्थिती 

मा. आमदार दिलीप वाघ,संजय वाघ, नितीन तावडे, अज़हर खान, विकास पाटील विजय पाटील, रंजीत पाटील, अभिजीत पवार, सुदर्शन महाजन, पंकज गढरी, उमेश ऐरंडे वासु महाजन ए. बी.अहीरे, नान देवरे, भागवत महालपुरे हे यावेळी उपस्थित होते.

तसेच यावेळी या कोरोना योद्धांचा सन्मान दिलीप भाऊ वाघ व इतर सन्मानीय व्यासपीठ यांच्यातर्फे करण्यात आले. पाचोरा तालुका आरोग्य अधिकारी डॉ समाधान वाघ, पाचोरा ग्रामीण रुग्णालय अधिक्षक डॉ अमित साळूंखे, डॉ गवळी आरोग्य सेविका भारती पाटील,जिजाबाई वाडेकर, वनिता जाधव, दीपाली भावसार, भिलाबाई ढोले, आकाश ठाकूर यांचा सन्मान करण्यात आला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज