fbpx

कोरोना योद्धा मुकेश पाटील यांचा सत्कार

mi-advt

 

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२१ ।  शहीद शिरीशकुमार फाऊंडेशन चे अद्यक्ष मुकेश पाटील ,विकास वाघ आणि त्यांचा मित्रपरिवाराने जळगाव येथील नेरीनाकाच्या स्मशानभूमीत बेवारस मृतदेहांवर अंतीमसंस्कार च काम करीत होते.त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राज्य पातळीवर देखील पुरस्कार देण्यात आला.त्याचबरोबर त्यांनी कोरोनाकाळात ज्या नातेवाईकांना जेवणाची व्यवस्था नव्हती अश्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना जेवण देखील उपलब्ध करून दिले.

.त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी ” एक आठवण आपल्या दारी” या उपक्रमाअंतर्गत अनेक ठिकाणी वृक्षारोपण देखील केले.या सर्व सामाजिक कामाची दखल घेत जळगाव लायन्स क्लब तर्फे त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.त्यावेळी मुकेश ने स्मशानात काम करतांना आलेले अनुभव देखील व्यक्त केले. त्यावेळी जळगाव लायन्स क्लब चे सेक्रेटरी जगदीश जाखेटे, प्रेसिडेंट-मनीष मंडोरा, ट्रेजरर-विनोद भंडारी,सदस्य-विनोद जवाहराणी आदी.उपस्थित होते

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज