fbpx

मास्टर कॉलनीत भरला कोरोना बाजार, महिला पत्रकाराला धमकी

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२१ । जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असताना जळगाव शहरातील मास्टर कॉलनीतील शाळेजवळ ईदचा बाजार भरला होता. या बाजारास यात्रे स्वरूप आले असतांना मास्क न वापरता गर्दी झालेली होती. रविवारी सांध्यकाळी 7 ची वेळ भरमसाठ गर्दी अशा ठिकाणी महिला पत्रकार शेख नाजनीन या कॅमेरा घेऊन व्हिडियो शूटिंग करत असताना त्यांना यावेळी काही नागरिकांनी धमकावत व्हिडिओ बंद करण्याची धमकी दिली.

जिल्ह्यात सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व बंद राहणार आहे. असं असतानाही शहरातील मास्टर कॉलनीतील शाळेजवळ ईदचा बाजार भरला होता. यावेळी महिला पत्रकार शेख नाजनीन या लाईव्ह करण्यासाठी गेल्या असताना त्यांनी यावेळी  कोरोना महामारिचा काळ आहे. आपण येथे गर्दी करुनका पण ऐकतो कोण ? उलट महिला पत्रकार हिला धमकावले तू कोन है ? अभी के अभी व्हिडिओ बंद करो. डिलीट करो व 100 – 150 लोकांचा जमाव त्या एकटया महिला पत्रकाराला घेतले व धमकी दिली. तू एकटी कशी राहु शकतेस तुझ्या घरी येऊन आम्ही सगळे चाल करुन येऊ घराची तोडफोड करू तुला पाहुन घेऊ.खुले आम दिला. तीला जमील शेख या सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तिने तेथून सोडवले व नंतर नाजनीन हीने एस.पी यांना फोन करुन वृतांत सांगितला. त्यांनी लगेच एम.आय.डी.सी पोलिस स्टेशनला कळवून गुन्हा नोंदवून घेतला. महिला पत्रकार नाजनीन शेख ही एकटी त्या ठिकाणी होती. त्यामुळे ती घाबरली आहे. तिला मिळाले त्या धमकिने संपूर्ण घर परिवार काळजीत आहे.

mi advt

नाजनीन शेख दिव्य जळगाव वेबसाइट ( इलेक्ट्रॉनिक) चलावते महिला पत्रकार हिला धमकावणे दमबाजी करणे तुझ्या जीवाचे बरे वाईट करुन टाकू. अशी धमकी एक जमावाने देणे. लोकशाहीतल्या 4 स्तंभाला हे काही नवीन नाही परंतु एका महिला पत्रकाराला अशी आवृतिचा जिल्हा पत्रकार संघ निषेध करीत आहे.

पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख संपूर्ण जिल्हा प्रशासन यांनी लक्ष ठेऊन कारवाई करावी. व या महिला पत्रकार नाजनीन शेख हिला पोलिस संरक्षण द्यावे. अशी मागणी जिल्हा पत्रकार संघ व ज्येष्ठ पत्रकार लढा समिती करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज