fbpx

जळगाव शहरात आजपासून मिळणार १८ ते ४४ वयोगटाला दुसरा डोस

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ जून २०२१ । शहरासह जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या खासगी लसीकरण केंद्रात कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थींची वणवण आता संपली आहे. महापालिकेच्या चेतनदास मेहता रुग्णालयात आज शुक्रवारपासून १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थींना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस उपलब्ध करण्यात आला आहे.

या ठिकाणी ४५ वर्षांवरील लाभार्थींसाठीही ही लस उपलब्ध असणार आहे. शहरात शुक्रवारी महापालिकेचे नऊ सिव्हिलचे दोन व खासगी एक अशा १२ केंद्रांवर लसीकरण आहे. त्यासाठी १२ हजार ९२० डोस उपलब्ध आहेत. जिल्ह्याला गुरुवारी २६ हजार काेविशिल्ड तर १८०० कोव्हॅक्सिन लसीचे डोस प्राप्त झाले.

त्यापैकी जळगाव शहरातील केंद्रासाठी १० हजार ९२० कोविशिल्ड व दोन हजार कोव्हॅक्सिनचे डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या रुग्णालयातील खालच्या मजल्यावर ४५ वर्षांवरील लाभार्थींना लसीकरण करण्यात येणार आहे. तर वरच्या मजल्यावर १८ ते ४४ वयाेगटातील लाभार्थींना लस देण्यात येणार आहे. दोन्ही गटासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक असणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज