fbpx

देशात लहान मुलांवरील कोरोना लस ‘या’ महिन्यात येणार

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२१ । गेल्या दीड वर्षापासून जग कोरोनाशी दोन हात करीत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जगभरात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. दरम्यान, भारतातही १८ वर्षापासून ते वयोवृद्धांचे लसीकरण करण्यात येत आहे. अशात आता लहान मुलांवरील कोरोना लस ऑगस्टपर्यंत येऊ शकते. यानंतर काही दिवसांतच देशात मुलांचे लसीकरण सुरू होऊ शकते. कोव्हिडच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका लक्षात घेत केंद्र सरकारने १ ते १८ वयोगटातील लहान मुलांवरील करोना प्रतिबंधात्मक लसीची ट्रायल सुरू केली आहे.

सांगितले जाते की, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत ही माहिती दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. तज्ज्ञांनुसार, मुलांसाठीची लस कोरोनाला नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरेल. यानंतर शाळाही उघडल्या जाऊ शकतात. देशात तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक संसर्ग होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी म्हटले होते. 

सर्वात आधी अमेरिकेत लहान मुलांचे लसीकरण सुरू

अमेरिकने जगात सर्वात आधी यंदा मे मध्ये १२-१५ वयोगटातील मुलांवर फायझर-बायोनटेकच्या लसीच्या वापराला मंजुरी दिली होती. युरोपीयन युनियनने गेल्या शुक्रवारीच मॉडर्नाच्या लसीच्या १२-१७ वयोगटावरील वापरास मंजुरी दिली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज