fbpx

भाजपा तर्फे भव्य कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन 

जळगाव लाईव्ह न्यूज | १६ सप्टेंबर २०२१ | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसा निमित्त भाजपा जळगाव जिल्हा व महानगर तर्फे दिनांक १७ सप्टेंबर शुक्रवार रोजी सकाळी ९ते दुपारी ५ वाजे पर्यंत भव्य कोरोना लसीकरण शिबिर सरदार वलभ्व्रभाई पटेल हॉल येथे आयोजन करण्यात आले आहे. असे जिल्हा अध्यक्ष आ सुरेश भोळे (राजु मामा) महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी सांगितले. लसीकरणाचा लाभ सर्व सामान्य नागरिकांनी जास्तीत जास्त घ्यावा असे आवाहन देखिलख केले आहे.

तसेच भा ज पा महानगरातिल मंडल अध्यक्ष, नगसेवक, आघाडीचे अध्यक्ष, व कार्यकर्ते ,यांनी आप आपल्या, मंडलातील,प्रभागातिल नागरिकांना या भव्य लसीकरणाचा लाभ मिळुन द्यावा असेही सुचित केले आहे.

तरी या भव्य कोरोना लसीकरण शिबिराला भा ज पा जिल्हा पदाधिकारी,नगरसेवक, मंडल अध्यक्ष,आघाडी अध्यक्ष,व कार्यकर्ते यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी ,डॉ राधेश्याम चौधरी, महेश जोशीं ,नितीन इंगळे, जिल्हा प्रसिध्दी मनोज भांडारकर यांनी कळविले आहे

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज