⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

जळगाव जिल्ह्यातील अधिकृत कोरोना आकडेवारी : ९ मे २०२१

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मे २०२१ । जळगाव जिल्हा प्रशासनाच्या कोवीड विभागाने पाठविलेल्या दिवसभराच्या अहवालात आज जिल्ह्यात ८३८ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ७५२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. चोपडा तालुक्यातील कोरोना संसर्ग वाढलेला आहे.

जळगाव जिल्ह्यात तीन आठवड्यांपासून कोरोना संसर्गाचा कमी झालेला असून दररोजचे रुग्ण कमी होत असल्याचा दिलासा देणारे चित्र आहे. रविवारी ५ हजार ९१६ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातून ८३८ नवे रुग्ण समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या १ लाख २९ हजार ८८७ इतकी झाली आहे. तर ७५२ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख १७ हजार ७४६ इतका झाला आहे. तर आज १७ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृताचा एकूण आकडा २ हजार ३३७ वर गेला आहे. सध्या जिल्ह्यात ९८०४ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

जळगाव शहर- १०६, जळगाव ग्रामीण- २१, भुसावळ- ६८, अमळनेर- ०७, चोपडा- १३६, पाचोरा- ५८, भडगाव- ०४, धरणगाव- १६, यावल- २८, एरंडोल- ५५, जामनेर- ३५, रावेर- ३१, पारोळा- १८, चाळीसगाव- ११८, मुक्ताईनगर- ८७, बोदवड- ३७, अन्य जिल्ह्यातील- १३.

जळगाव शहरासाठी दिलासा

दरम्यान, मार्च महिन्याच्या सुरुवातीला जळगाव शहरात रोज बाधित रुग्णांचा उच्चांक पाहायला मिळत होते. त्यामुळे जळगाव शहर हॉटस्पॉट ठरले होते. मात्र, मागील काही दिवसापासून नव्या बाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण अधिक असल्याने दिलासादायक चित्र आहे. आज १०६ रुग्ण आढळून आले आहे. तर ११६ बरे झाले आहे. सध्या शहरात १५६५ रुग्णांवर उपचार सुरु आहे.