Jalgaon Corona Update : सलग दुसऱ्या दिवशी रुग्णवाढ, आज आढळले ४६ रुग्ण

बातमी शेअर करा

Jalgaon Corona Updates जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२२ । जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या तीन दिवसांपूर्वी दहावर गेल्यानंतर बुधवारी मोठा आकडा समोर आला होता. बुधवारी ३९ रुग्ण आढळून आल्यानंतर आज दिवसभरात नव्या ४६ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर – १५, भुसावळ तालुका – २१, अमळनेर – २, धरणगाव – १, एरंडोल – ३, रावेर – १, चाळीसगाव – ३ असे एकूण ४६ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्ह्याचा रिकव्हरी दर ९८.१८ टक्के

जिल्ह्यात आजपर्यंत एकूण १ लाख ४२ हजार ९५२ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २३७ रुग्ण बरे होवून घरी परतले आहे. आतापर्यंत २ हजार ५७९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यात होम आयसोलेशन केलेल्या पॉसिटीव्ह रुग्णांची संख्या १२२ आहे. आज जिल्ह्याचा रिकव्हरी दर ९८.१८ टक्के आहे.

हे देखील वाचा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar