⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

जळगाव जिल्ह्यात आज १ हजार १७६ नवीन रुग्ण; शहरात सर्वाधिक ३३३ रुग्ण

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोना रोजच नवनवीन रेकॉर्ड नोंदवत आहे. आज जळगाव जिल्ह्यात १ हजार १७६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. आज देखील जळगाव शहरात सर्वाधिक ३३३ नवीन रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

आज ११७६ नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या ९५ हजार ९५८ झाली आहे. तर आज ११७१ कोरोना रुग्ण आजारातून बरे होऊन घरी गेले आहे. त्यामुळे आतापर्यंत बरे होणार्या रुग्णांची एकूण संख्या ८२ हजार ६०० वर गेली आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसापासून सुरु असलेला कोरोना मृताच आकडा वाढतच आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे, आज १५ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृताच आकडा १७१२ वर गेला आहे. जिल्ह्यात महिनाभरापासून वाढणाऱ्या संसर्गामुळे ॲक्‍टिव्ह रूग्‍णांचा आकडा देखील वाढत आहे. ११ हजार ६४६ रुग्ण उपचार घेत आहे.

आज जळगाव शहर ३३३, जळगाव तालुका ४१, भुसावळ ४२, अमळनेर ३४; चोपडा १६२; पाचोरा ४३; भडगाव ०८; धरणगाव २८; यावल ८५; एरंडोल ४६, जामनेर ४८; रावेर ६१, पारोळा ३२; चाळीसगाव ५५, मुक्ताईनगर ०३; बोदवड ४५ आणि इतर जिल्ह्यातील १० असे ११७६ रूग्ण आढळून आले आहेत.