fbpx

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच : ११४१ नव्या रुग्णांची नोंद

mi-advt

 जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून आज बुधवारी जिल्ह्यात १ हजार १४१ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर आजचं १ हजार ०७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.

आज ११४१  नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या ९७ हजार ०९९ झाली आहे. तर आज १०७१ कोरोना रुग्ण आजारातून बरे होऊन घरी गेले आहे. त्यामुळे आतापर्यंत बरे होणार्या रुग्णांची एकूण संख्या ८३ हजार ६७१ वर गेली आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसापासून सुरु असलेला कोरोना मृताच आकडा वाढतच आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे, आज १४ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृताच आकडा १७२६ वर गेला आहे. जिल्ह्यात महिनाभरापासून वाढणाऱ्या संसर्गामुळे ॲक्‍टिव्ह रूग्‍णांचा आकडा देखील वाढत आहे. ११ हजार ७०२ रुग्ण उपचार घेत आहे.

आज जळगाव शहर १६८, जळगाव तालुका २७, भुसावळ १०२, अमळनेर ५३; चोपडा ७९; पाचोरा १२१; भडगाव ३२८; धरणगाव ५५; यावल ६२; एरंडोल ४१, जामनेर ४४; रावेर ८८, पारोळा ३७; चाळीसगाव ३२, मुक्ताईनगर ९२; बोदवड १०३ आणि इतर जिल्ह्यातील ०५ असे ११४१ रूग्ण आढळून आले आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज