fbpx

दिलासादायक : जिल्ह्यात आज बाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्याची संख्या अधिक !

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ एप्रिल २०२१जळगाव जिल्ह्यातील कोरोनाची गती काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. गेल्या काही दिवसापासून सुरु असलेली अकराशेहून अधिक रुग्ण आढळून येणारी मालिका आजही कायम आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात ११६७ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर दिलासादायक असे कि आज बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची अधिक आहे. आज दिवसभरात ११७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.

 

आज ११६७ रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ९९ हजार ४५६ इतकी झाली आहे. तर आज ११७६ कोरोना रुग्ण आजारातून बरे होऊन घरी गेले आहे. त्यामुळे आतापर्यंत बरे होणार्या रुग्णांची एकूण संख्या ८५ हजार ९८९  वर गेली आहे.

 

जिल्ह्यात मागील काही दिवसापासून सुरु असलेला कोरोना मृताच आकडा वाढतच आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे, आज १७ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृताच आकडा १७५८ वर गेला आहे. जिल्ह्यात महिनाभरापासून वाढणाऱ्या संसर्गामुळे ॲक्‍टिव्ह रूग्‍णांचा आकडा देखील वाढत आहे. ११ हजार ७०९ रुग्ण उपचार घेत आहे.

 

आज जळगाव शहर २६०, जळगाव तालुका ४४, भुसावळ १८०, अमळनेर ७५; चोपडा १६३; पाचोरा ४४; भडगाव ३४; धरणगाव ६०; यावल ४७; एरंडोल ४१, जामनेर ७४; रावेर ३९, पारोळा ०५; चाळीसगाव ५१, मुक्ताईनगर ४४; बोदवड ०३ आणि इतर जिल्ह्यातील ०३ असे ११६७ रूग्ण आढळून आले आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज