fbpx

दिलासादायक : जिल्ह्यात आज पुन्हा नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशी कोरोना नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक झाली आहे. यामुळे जळगावकरांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र, मृताच्या आकड्याने चिंता वाढली आहे. मागील तीन दिवसापासून २० रुग्णांचा मृत्यू होत असून यामुळे चिंता वाढली आहे.

आज दिवसभरात जिल्ह्यात १०३३ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आजचं ११०३ ररुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या १ लाख ०७ हजार १०३ झाली आहे. त्यापैकी बरे होणार्या रुग्णांची एकूण संख्या ९३ हजार ९७६ वर गेली आहे. 

जिल्ह्यात मागील काही दिवसापासून सुरु असलेला कोरोना मृताच आकडा वाढतच आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे, आज २० रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृताच आकडा १८८८ वर गेला आहे. दरम्यान, मागील तीन दिवसापासून बाधित रुग्णांपेक्षा बरे होणार्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने जिल्ह्यातील ॲक्‍टिव्ह रूग्‍णांच्या संख्येत हळूहळू घट होतानाचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सध्या ११२३९ रुग्ण उपचार घेत आहे.

जळगाव शहर-२१२, जळगाव ग्रामीण-५९, भुसावळ-१३०, अमळनेर-१०५, चोपडा-८७, पाचोरा-७९, भडगाव-१०, धरणगाव-५३, यावल-३०, एरंडोल-४९, जामनेर-१९, रावेर-८४, पारोळा -२७, चाळीसगाव-३७, मुक्ताईनगर-३२, बोदवड-१ आणि इतर जिल्ह्यातील २० असे एकुण १ हजार ३३ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज