⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

अरे बापरे…! जळगाव जिल्ह्यात आज १०९० नवे रूग्ण आढळले

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून जिल्ह्यात बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होतानाचे दिसून येत. दरम्यान, आज दिवसभरात जिल्ह्यात तब्बल १०९० नवे  रूग्ण आढळून आले आहेत. त्यात जळगाव शहरात ४४४ बाधित आढळून आले आहेत. 

जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन जनता कर्फ्यू, लॉकडाऊनसह अनेक प्रयत्न करत आहेत. तरी देखील जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आजच्या आकडेवारीने संसर्ग अतिशय भयावह पातळीवर पोहचल्याचे दिसून आले आहे.  आज १०९० रुग्ण  आढळून आले आहेत.  तर आजच ९०७ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ७८ हजार ४७० वर गेली आहे. त्यात ६७ हजार ०९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. दरम्यान, आज ११ बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृताच एकूण आकडा १५०१ वर गेला आहे.  जिल्ह्यात ९ हजार ८७३ रुग्ण उपचार घेत आहे

आज जळगाव शहरात सर्वाधीक म्हणजे तब्बल  ४४४ पेशंट आढळून आले आहेत. शहरच्या सर्व भागांमधील हा संसर्ग असल्याचे रिपोर्टमधून दिसून आले आहे. याच्या खालोखाल भुसावळात ११९ कोरोना बाधीत आढळून आले आहेत.

जळगाव शहर ४४४, जळगाव तालुका-३६; भुसावळ ११९, अमळनेर-५०; चोपडा-७६; पाचोरा-२६; भडगाव-१४; धरणगाव-६१; यावल-१७; एरंडोल-४०; जामनेर-६९; पारोळा-१७; चाळीसगाव-५६; मुक्ताईनगर-४२; बोदवड-९ आणि इतर जिल्ह्यातील १ असे रूग्ण आढळून आले आहेत.