fbpx

जिल्ह्यात कोरोनाचा विस्‍फोट ; १२२३ नवे बाधित रुग्ण, मृत्‍यूचा आकडाही वाढताच

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२१ । जिल्ह्यातील कोरोनाचा विस्‍फोट सुरू आहे. आज दिवसभरात तब्बल १२२३ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर तर जिल्‍ह्‍यात कोरोनामुळे होणारे मृत्‍यूचे तांडव देखील कमी होत नसल्‍याचे चिंता वाढली आहे. गेल्या २४ तासांत १३ जणांचा बळी गेला. हे दोन्ही आकडे या टप्प्यातील विक्रमी व धडकी भरविणारे आहेत.

जळगाव जिल्‍ह्‍यातील कोरोनाचा वाढता आलेख चिंता वाढविणारा आहे. साधारण महिनाभरापासून संसर्ग वाढताच आहे. सातत्‍याने आकडा वाढत असून संपुर्ण जिल्‍हाच आता हॉटस्‍पॉट बनला आहे. यातही जळगाव शहरासह चोपडा, अमळनेर आणि भुसावळ तालुक्‍यात परिस्‍थिती अधिक गंभीर बनलेली आहे. यामुळे नागरीकांनी काळजी घेणेच कोरोना रोखण्यास मदत करणार आहे.  

आज दिवसभरात ९०८ रूग्‍ण बरे होवून घरी गेले आहेत. यामुळे आतापर्यंत एकूण ६८ हजार ९८१ रूग्ण बरे झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या ८० हजार ७८६ झाली आहे. महिनाभरापासून वाढणाऱ्या संसर्गामुळे ॲक्‍टिव्ह रूग्‍णांचा आकडा देखील वाढत असून सद्यस्‍थितीत १० हजार २७९ ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत आहेत. कोरोनामुळे मृत्‍यू होणाऱ्यांचा आकडा देखील कमी होत नाही. जिल्ह्यात आज देखील १3 रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण १ हजार ५२६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर २४८, जळगाव तालुका-१३; भुसावळ 135, अमळनेर-१५३; चोपडा-३३८; पाचोरा-०३; भडगाव-३०; धरणगाव-३१; यावल-४५; एरंडोल-२९; जामनेर-६५; पारोळा-३४; चाळीसगाव-२३; मुक्ताईनगर-२९; बोदवड-२७ आणि इतर जिल्ह्यातील ०१ असे १२२३ रूग्ण आढळून आले आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज