⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

जळगाव जिल्ह्यात आज ८७ नवे बाधित रुग्ण, वाचा तुमच्या तालुक्यातील आकडेवारी

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२१ । जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी नव्या बाधित रुग्णांची संख्या ८० वर आढळून आली आहे. तर आज देखील एकही रुग्णांचा मृत्यू झाला नसल्याचे आज प्राप्त अहवालातून दिसून आला. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये भुसावळमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे.

गेल्या काही महिन्यापासून जिल्ह्यात नव्या कोरोना बाधितांची संख्या ५ ते १० च्या आत आढळून येत होती. मात्र ओमिक्रोनमुळे राज्यासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. आज शनिवारी दिवसभरात कोरोनाचे ८७ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज एकही रुग्ण बरा झालेला नाही तसेच आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४३ हजार १२७ बाधित रूग्ण (Corona Positive) आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २३८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५७९ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ३१० बाधित रूग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहे.

असे आढळले रुग्ण
आजच्‍या बाधितांमध्‍ये जळगाव शहरात १६, जळगाव ग्रामीण १, भुसावळ तालुका ४०, अमळनेर ०५, चोपडा ६, भडगाव १, धरणगाव १, जामनेर १, पारोळा २, चाळीसगाव ९, मुक्ताईनगर ४ व इतर तालुक्यातील १ असे एकुण ८७ बाधित रूग्ण आढळले आहे.

हे देखील वाचा :