⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

जळगावकरांनो सावधान ! जिल्ह्यात आज तब्बल ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोनाने (Corona) पुन्हा हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. गेल्या तीन दिवसापासून नव्या बाधितांमध्ये मोठी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात ८८ बाधित रुग्ण आढळून आले आहे. यात जळगाव (Jalgaon) शहरासह चोपडा आणि भुसावळ तालुक्यात रूग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून नव्या बाधितांची संख्या ५ च्या आत येत होती. परंतु देशभरासह राज्यात कोरोनाचा नवा प्रकार ओमिक्रोन आढळून आल्यानंतर कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यात देखील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांमध्‍ये आकडा डबलने वाढत आहे.

यातच आज जळगाव जिल्ह्यात एकुण ८८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४३ हजार ४० बाधित रूग्ण (Corona Positive) आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २३८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५७९ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जळगाव शहरात सर्वाधिक

आजच्‍या बाधितांचा आकडा ८८ वर पोहचला असून, भुसावळ, चोपडा (Chopda) तालुक्‍यासह जळगाव शहराची अधिक चिंता वाढली आहे. आजच्‍या बाधितांमध्‍ये जळगाव शहरात सर्वाधिक ३१, भुसावळ तालुका २४, चोपडा २७, यावल २, रावेर १, चाळीसगाव ३ असे एकुण ८८ बाधित रूग्ण आढळले आहे. आता जिल्ह्यात २२३ बाधित रूग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहे. आज दिवसभरात एक रूग्ण बरा होवून घरी परतला आहे.

हे देखील वाचा :