⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच ; आज पुन्हा २१ रुग्णांचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. आज शनिवारी जिल्ह्यात १११५ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. मात्र, आज पुन्हा २१ जणांचा बळी गेल्याने मृत्युदराची चिंता कायम आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसापासून रोज हजार ते बाराशे रुग्ण आढळून येत आहे. सलग तीन दिवस नवे बाधित कमी व बरे होणारे रुग्ण अधिक असे दिलासादायक चित्र दिसून आले होते. मात्र, आज पुन्हा रुग्णांची संख्या जास्त आढळून आली आहे. आज देखील जिल्ह्यात १ हजार ११५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.तर आज १ हजार १०३ लोकांनी कोरोनावर विजय मिळवला आहे. 

दरम्यान, जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या १ लाख ८ हजार २१८ वर पोचली आहे. त्यापैकी बरे होणाऱ्यांचा आकडा ९५ हजार ०७९ वर पोचला आहे.  दरम्यान, जिल्ह्यात मृताचा आकडा मात्र वाढताच आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात २१ रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी ५ रूग्ण चाळीसगाव तालुक्यातील आहे. जिल्ह्यातील बळींची संख्या १९०९ झाली आहे. जिल्ह्यात सध्या ११ हजार २३० रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे.

जळगाव शहर-२६०, जळगाव ग्रामीण-१५, भुसावळ-२१३, अमळनेर-१७, चोपडा-१२२, पाचोरा-३६, भडगाव-१०, धरणगाव-४५, यावल-३८, एरंडोल-५८, जामनेर-६५, रावेर ७७, पारोळा-३१, चाळीसगाव -४६, मुक्ताईनगर-४२, बोदवड-३४ आणि इतर जिल्हे ८ असे एकुण १ हजार ११५ बाधित रूग्ण आढळून आले आहे.