⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच ; आज ९५६ रुग्ण आढळले, वाचा तुमच्या परिसरातील अपडेट्स..

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूचे तांडव पुन्हा सुरू झाले आहे. आज पुन्हा सहा जणांचा बळी गेला, तर सलग सातव्या दिवशी जिल्ह्यात नऊशेहून अधिक रुग्ण सापडले. आज ९५६ नवे रुग्ण आढळून आले. त्यापैकी तब्बल ३४१ रुग्ण जळगाव शहरातील आहेत.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. दुसऱ्या लाटेत आता रुग्णसंख्या जशी वाढत आहे तसे मृत्यूही वाढत आहेत. मागील काही दिवसपासून जिल्ह्यात पाच-सहा रुग्णांचा बळी जात आहे. त्यामुळे एकूण बळींचा आकडा एक हजार ४५५ झाला आहे. आज  ७०९ जण बरे होवून घरी गेले आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या ६३ हजार ०२७ झालेली आहे. सलग सातव्या दिवशी जिल्ह्यात नऊशेहून अधिक रुग्ण सापडले. मंगळवारी ९५६ रुग्णांसह एकूण रुग्णसंख्या ७२ हजार ५७५

आज जळगाव शहर-३४१, जळगाव ग्रामीण- ४८, भुसावळ-११७, अमळनेर-२४, चोपडा-१०६, पाचोरा-३२, भडगाव-३२, धरणगाव-५८, यावल-२४, एरंडोल-१८, जामनेर-७२, रावेर-१, पारोळा-६, चाळीसगाव-४६, मुक्ताईनगर-२५, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील ६ असे एकुण ९५६ रूग्ण आढळून आले आहे.