fbpx

जळगाव जिल्ह्यात आज १०२ नवीन कोरोना रुग्ण तर ३१२ रुग्णांची कोरोनावर मात

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२१ । आज सोमवार दिवसभरात जिल्ह्यात १०२ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज तब्बल ३१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाणही कमी झाल्याची बाब दिलासादायक आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याची चिन्हे आहेत. एप्रिल व मे महिन्यातील लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. एकूण रुग्णसंख्या १ लाख ४० हजार ९९४ वर गेली आहे. त्यापैकी १ लाख ३५ हजार ६०१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ८३८ रूग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात १ बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. एकूण मृताचा आकडा २५५५ वर गेला आहे.

जिल्ह्यातील आजची आकडेवारी

जळगाव शहर-२ , जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-५, अमळनेर-१, चोपडा-२, पाचोरा-४, भडगाव-२, धरणगाव-०, यावल-४, एरंडोल-४७, जामनेर-४, रावेर-१, पारोळा-१, चाळीसगाव-२९, मुक्ताईनगर-०, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील ० असे एकुण १०२ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज