fbpx

जळगाव जिल्हा कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावर ; आज केवळ ५ नवे रुग्ण

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२१ । कोरोनाच्या पहिल्या लाटेत मृत्यूदरामुळे सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या जळगाव जिल्ह्याने दुसऱ्या लाटेत थक्क करणारी कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता ५०० च्या आत आली आहे.

तर आज रविवारी जिल्ह्यात केवळ ५ नवीन बाधित रुग्ण आढळून आले आहे. तब्बल १३ तालुक्यांमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाहीय. तर आज ६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. जळगाव शहर व जामनेर तालुका वगळता जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये एकही रूग्ण आढळून आलेला नाहीये.

जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झाली. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जळगाव जिल्ह्यात पुन्हा संसर्ग वाढायला सुरुवात झाली. त्यानंतर मार्च व एप्रिल महिन्यात संसर्गाने उच्चांक गाठला होता. या दोन महिन्यांत दररोज हजारावर नवीन बाधित रुग्ण आढळत होते. त्यामुळे आरोग्य सुविधांचा देखील तुटवडा जाणवायला लागला होता. विशेष म्हणजे कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण देखील मार्च व एप्रिल महिन्यात लक्षणीय झाले होते.

मार्च व एप्रिल महिन्यात जळगाव जिल्ह्यात करोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येने उच्चांक गाठल्यानंतर मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सक्रिय रुग्णसंख्या घटण्यास सुरुवात झाली. दररोज आढळणाऱ्या नवीन बाधितांची संख्याही कमी होत असताना दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत गेली. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्येचा आलेखही खाली आला. मे महिन्यात जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या दहा हजार पेक्षा जास्त होती. मात्र, मे महिन्याच्या अखेरपर्यंत घटून ती साडेपाच हजाराच्या टप्प्यात आली. त्यापाठोपाठ आलेला जून महिना देखील जळगाव जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरला. सध्या स्थितीत जळगाव जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या ५०० च्या आत आली आहे. 

आजच्या अहवालात जळगाव शहर-२, जामनेर-३ असे पाच रूग्ण आढळून आले आहे. उर्वरित १३ तालुके निरंक असल्याचे आजच्या अहवालात दिसून आले आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आजच्या अहवालात आतापर्यंत १ लाख ४२ हजार ३६१ रूग्ण बाधित आढळले आहे. तर १ लाख ३९ हजार ३३५ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात चाळीसगाव तालुक्यातील एका बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज