⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

धोक्याची घंटा : जळगावात कोरोनाने पुन्हा गाठली दुहेरी संख्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यात गेल्या जवळपास दोन ते महिन्यानंतर आज कोरोना बाधितांची संख्या दहावर गेली आहे.आज जिल्ह्यात दिवसभरात नव्या १६ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाले आहे.

असे आढळले रुग्ण
जळगाव-५, भुसावळ तालुक्यात-६, चोपडा तालुक्यात-१, चाळीसगाव-२, मुक्ताईनगर-२ असे एकुण १६ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ८५४ हजार बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २३६ बरे होवून घरी परतले आहे. आतापर्यंत २ हजार ५७९ रूग्णंचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यात होम आयसोलेशन केलेल्या पॉसिटीव्ह रुग्णांची संख्या 30 आहे. तर आज एकाने कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी दर 98. 18% आहे.

दरम्यान, राज्यात आज कोरोना रुग्णांनी 12 हजारांचा आकडा पार केला आहे, आज राज्यात 12 हजार 160 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर पुन्हा पोहोचले आहे. राज्यात आज ओमिक्रॉनचे 68 रुग्ण आढळले आहेत. मुंबई-40, पुणे-14 नागपूर- 4, पुणे ग्रामीण ,पनवेल प्रत्येकी 3 तर कोल्हापूर, नवी मुंबई, सातारा ,रायगड 1 रुग्ण, ही आजची आकडेवारी आहे. राज्यात आतापर्यंत 578 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 259 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. आज राज्यात 11 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल आहे.

हे देखील वाचा :